हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मा.खा.सुभाष वानखेडे ॲक्शन मोडवर
निवघा बा प्रतिनिधी…हिंगोली लोकसभा मतदार संघाचे मा.खा. सुभाष वानखेडे साहेब यांनी खरीप पीक विमा 2023 संदर्भात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांवर पीक विमा वाटपात केलेल्या अन्यायाविरोधात चौकशी करण्यासंदर्भाचे लेखी निवेदन थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांना दिले आहे
हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. अनेक गावे हे 2023 च्या पिकविम्यापासुन वंचित राहिले आहेत. काही गावातील शेकऱ्यांसोबत असा प्रकार घडला की एका शेकऱ्याच्या बँक खात्यावर पिकविम्याची रक्कम ४०००० हजार रुपये जमा करण्यात आली तर त्याच शेती शेजारील गटातील शेतकऱ्याच्या बँक खात्यावर २००० रुपये एवढी तुटपुंजी पिकविमा रक्कम जमा करण्यात आली.
अश्या प्रकारची धर सोड वृत्ती सदरील पिकविमा कंपन्याकडून करून शेतकऱ्यांची अव्हेलना करण्यात आली आहे. त्यामुळे हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना 2023 च्या पिकविम्याचा लाभ अद्याप पिक विमा कंपनीकडून मिळाला नाही. हदगाव-हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या पिकविम्याची रक्कम आणखी मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना बँकामधे हेलपाटे मारावे लागत आहेत पिकविमा कंपन्यांच्या या बेजबाबदारपणामुळे माझ्या हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील शेतकरी पुरता हवालदील झाला आहे तरी मुख्यमंत्री साहेबांनी हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीकविमा सरसकट मंजूर करून द्यावा अशा आस्याचे लेखी निवेदन शिवसेना ( उभाठा ) पक्षाचे नेते माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी थेट मुख्यमंत्री यांना दिले आहे
हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यावर पिक विमा कंपनीने केलेला अन्याय कदापि सहन केला जाणार नाही पिक विमा कंपनीच्या या बेजबाबदारपणाची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित पिक विमा कंपनीची चौकशी करून दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा सरसकट पिक विमा मिळून द्यावा अन्यथा पिक विमा कंपनी विरोधात आम्ही शिवसेना ( उभाठा ) स्टाईलने आंदोलन करू