सोलापूर – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर महानगरपालिका व पुणे जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वयोगट 14 वर्षाखालील राज्यस्तरीय आंतरशालेय सॉफ्ट टेनिसस्पर्धेमध्ये नागेश करजगी ऑर्किड स्कूलची कुमारी मृण्मयी गायकवाड हिने सांघिक खेळात गोल्ड मेडल तर वैयक्तिक खेळात सिल्वर मेडल प्राप्त करत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.
मृण्मयी गायकवाड हिला शाळेचे क्रीडाशिक्षक श्री आनंदी लिगाडे व ज्ञानदीप जाधव तसेच प्रशिक्षक महेश झांबरे यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री कुमार दादा करजगी, सचिवा सौ वर्षाताई विभुते, व्यवस्थापक श्री अक्षय चिडगुंपी, शाळेच्या प्राचार्या सौ रूपाली हजारे आणि मार्गदर्शिका सौ मीना पारखे यांनी यशस्वी मृण्मयी गायकवाड हिचे अभिनंदन केले.
























