मुदखेड / नांदेड – मुदखेड नगर परिषद निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून काही बुथवर सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
मुदखेड शहरातील एकूण मतदार संख्या २१ हजार ७४९ यामध्ये महिला ११,०१९ आणि १०,७२७ पुरुष तर इतर तीन सार्वत्रीक नगर परिषद निवडणूक दि.२ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता सुरु झाली. सकाळी मतदान केंद्र १ व २ मधील ईव्हीएम मशीनमध्ये काही तांत्रीक बिघाड झाल्यामुळे काही वेळ मतदान थांबले होते.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मारोती जगताप, विजयकुमार पाटे, यांना माहीती मिळताच ताबडतोब त्या केंद्रावर जाऊन ईव्हीएम मशीन दुरुस्त करून मतदान प्रक्रियेला सुरुवात केली. या केंद्रावर सायंकाळी ६ः३० वार्जपर्यंत तर प्रभाग क्र.२ (ब) मध्ये मतदान प्रक्रिया संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत सुरु होती.
२५ निवडणूकीत पुरुष ८११९ आणि महिला ७८७८ तर इतर तीन असे एकूण १५,९९७ मतदारांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून ७३.५५% झाले आहे. मतदान केंद्र २५ मध्ये प्रभाग क्र. १० मध्ये सर्वात जास्त मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान प्रभाग क्र.३ मध्ये झाले आहे.
मुदखेडच्या मतदारानी ७३.५५% करून १० नगराध्यक्षाचे तर ८८ नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद केले आहे. आता मतमोजणी दि.२१ डिसेंबर रोजी होणार असून कोण विजयी होणार हे त्याच दिवशी कळणार आहे.
या मतदान प्रक्रियेचे नियोजन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आनंद देऊळगावकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी मारोती जगताप, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी जगदिश दळवी, विनयकुमार पाटे,व त्यांचे सर्व सहकारी यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार नियोजन केले होते. आणि पुर्ण निवडणूक होई पर्यत पोलिस निरिक्षक धीरज चव्हाण यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


























