तभा फ्लॅश न्यूज/ परवेझ मुल्ला : कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली निर्माण व्हावी यासाठी अनेकांनी आप – आपल्या परीने कोणी व्याजाने, बॅंकेचे कर्ज काढून, उसनवारी पैसे घेऊन कळंब नगर परिषदेच्या मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलात (सुनील मार्केट) मध्ये लाखो रुपये डिपाँझीट भरुन गाळे घेऊन आपली दुकाने सुरू केली.
याप्रसंगी काहींचे दुकाने चालली, काहींनी न चालल्याने बंद केली. त्याचे कारण एकच की तळमजल्यात ज्या दुकानदारांची दुकाने आहेत तिथे पावसाळ्यात दुकानात पाणी शिरुन तलावाची स्थिती निर्माण होते, दरवर्षी हिच बोंब असते, अनेकवेळा येथील गाळेधारकांनी तक्रारी केल्या होत्या परंतु पालिका प्रशासनाने मात्र या कडे दुर्लक्ष केले. दरमहा भाडे वसुली मात्र राजकार पद्धतीने करत आहेत.
गेल्या तीन – चार दिवसात मोठा पाऊस पडल्याने तळमजल्यातील अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने, तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते. यावेळी व्यापाऱ्यांनी मोटार पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला परंतु दुकानातील साहित्याचे, सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच ठिकाणी तिसऱ्या मजल्यावर नगर पालिका आहे. मात्र प्रशासनाने बघ्याची भुमिका केल्याने व्यापाऱ्यांनी लाखो रुपयाचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई मिळावी, तसेच दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात निवेदन दिले असून यावर संपत भवर, बालाजी गपाट, विठ्ठल माने, बालासाहेब नलावडे, केशव धाकतोडे आदी व्यापारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...