तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : महापालिकेच्या स्वच्छता मोहीम ६.० चा प्रारंभ आज करण्यात आला आहे. या अंतर्गत शहर व हद्दवाढ भागातील विविध ठिकाणच्या पाण्यांच्या टाक्यांचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी आज विविध १२ ठिकाणच्या पाण्याच्या टाक्यांचा परिसरात साफसफाई करण्यात आली.
सोलापूर शहर व हद्दवाढ भागात नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी एकूण ३५ ठिकाणी उंचावरील व जमिनीवरील टाक्याच्या असलेल्या पिण्याच्या पाण्याचे टाक्याच्या आजूबाजूला असलेले झाडी झुडपे, गवत, माती- अजोरा, कचरा पावसामुळे जागेवर कुजून त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने आयुक्त सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवि पवार व सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी सोलापूर महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील १ ते ८ विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या स्मशानभूमीच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेच्या आज पहिल्या दिवशी असून या मोहिमेमध्ये एकूण १२ पाणी टाकी परिसर स्वच्छता करण्यात आली.
Post Views: 26