हदगाव / नांदेड – हदगाव नगरपरिषद २०२५ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरव वांडेकर तर सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे या त्रिमूर्तीने वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार ही निवडणूक प्रक्रिया अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे दि. १० नोव्हेंबर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापासून ते दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी निकाल लागेपर्यंत सदरील कार्यक्रम अतिशय प्रभावी, पारदर्शी व भयमुक्त वातावरणात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवु न देता शहरात साधी एन. सी. (अदखलपात्र गुन्हा) दाखल झाल्या नसल्यामुळे मतदारांच्या मिळालेल्या अभूतपूर्व सहकार्यामुळे ही निवडणूक प्रशासनास पार पडण्यात यश मिळाले.
दि. ६ नोव्हेंबर रोजी हदगाव नगर परिषदेचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले तदनंतर दि. १० नोव्हेंबर पासून खरी रणधुमाळी सुरू झाली. नामनिर्देशन पत्र भरण्यापासून ते दि.२ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर दि.२१ डिसेंबरला मतमोजणी होण्यापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत जगताप यांच्या खांद्याला- खांदा लावून काम करणारे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरव वांडेकर, चामणीकर,सचिन वाघमारे ,धीरज झुडपे,प्रसाद कदम, सखाराम बोरकर, प्रवीण मंगनाळे, संकेत लांडगे, रवींद्र डेंगळे, गोविंद शिरसाट, प्रशांत डोईजड, प्रणाली मुजमुले,मोनाली रावते यांच्यासह इतर कर्मचारी यांनी नामांकन भरणे, माघार घेणे, याद्या दुरुस्ती करणे तसेच प्रत्यक्ष मतदान काळात व मतमोजणी पर्यंत सगळी यंत्रणा आपापली जबाबदारी सांभाळून सगळी प्रक्रिया अतिशय कुशलतेने हाताळली तर वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे व त्यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी यांनी सुद्धा सुरुवातीपासून ते मतमोजणी पर्यंत शहरात कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न कुठेच उद्भवू दिला नाही. यासाठी हदगाव शहरातील सर्वपक्षीय नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांचे ही निवडणूक सुरळीत पार पडण्याकरिता प्रशासनाला व पोलिसांना सहकार्य लाभले.


























