हदगाव – केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या पर्यावरण विभागाच्या आदेशान्वये पर्यावरणास घातक असलेल्या एकल प्लास्टिकचा होत असलेल्या भरमसाठ वापराबद्दल याच्यावर कुठेतरी अंकुश लावण्याकरिता धडक मोहीम राबविण्याचे आदेश श्रीमती दोनुरू अनन्या रेड्डी भा.प्र.से मुख्याधिकारी तथा परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडून प्राप्त होताच दि.३ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरातून ४० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आली असून यावेळी एकूण १८ हजार रुपये दंडात्मक वसुली देखील करण्यात आली.
यावेळी पथक प्रमुख प्रशांत डोईजड यांच्यासह शहर समन्वयक प्रणाली मुजमुले, मल्हारी गायकवाड, रवी राठोड, दिगंबर काळे,सिद्धार्थ पंडित, शेख मोहम्मद यांनी या मोहिमेअंतर्गत परिश्रम घेतले.
सामान्य जनता दैनंदिन जीवनात गरजेपेक्षा जास्त प्लास्टिक वापरते चांगले पर्याय उपलब्ध असतानाही आपण सवयीमुळे प्लास्टिक एकल पिशव्या वापरत असतो या प्लास्टिक पिशव्या वायू प्रदूषण वाढविण्याचे प्रमुख कारण आहे. या पिशव्या नदी, नाले आणि समुद्रात पोहोचतात आणि त्यात राहणाऱ्या प्राण्यांचे तसेच कचऱ्याच्या ढिगारावर असणाऱ्या पिशव्यांमुळे अनेक प्राण्यांचे मृत्यूचे कारण ही बनतात त्यामुळे केंद्र व राज्य शासनामार्फत धडक कारवाई वेळोवेळी राबविण्यात येत असते.






















