टेंभुर्णी – बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन कटक , ओडिसा येथे होणार असून बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती महेंद्र सोनवणे यांनी दिली आहे.
टेंभुर्णी तालुका माढा येथे बामसेफचे कार्यकर्ते महेंद्र सोनवणे हे अधिवेशनाच्या तयारी अंतर्गत प्रचार प्रसार जोमाने करीत आहेत .या अधिवेशनासाठी माढा तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते जाणार आहेत.
बामसेफचे 42 वे अधिवेशन व भारत मुक्ती मोर्चाचे 15 वे राष्ट्रीय अधिवेशन कटक ओडिसा या ठिकाणी 26 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत होणार आहे.
दिनांक 26, 27 व 28 डिसेंबर या दिवशी बामसेफचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे तर भारत मुक्ती मोर्चाचे 29 व 30 डिसेंबर या दोन दिवसात अधिवेशन होणार आहे .एकूण पाच दिवसांचे अधिवेशन आहे ,तरी देशभरातून तसेच राज्यातून असंख्य कार्यकर्ते जाणार आहेत . या अधिवेशनाच्या तयारी अंतर्गत माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे प्रचार प्रसार जोमाने चालू आहे. यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे भरत दळवी ,प्रशांत गायकवाड , ॲड .तुकाराम राऊत , गणेश उजगीरे ,महेंद्र सोनवणे , नागनाथ जगताप हे परीश्रम घेत आहेत.


























