मोडनिंब – येथे कैलासदादा तोडकरी मित्र परिवार व ग्रामपंचायत मोडनिंब यांच्या वतीने रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या इफ्तार पार्टीत सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.
सर्वांनी एकत्रितपणे सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.भाजप नेते रणजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे कैलास तोडकरी यांनी सांगितले. बंधुभाव वाढवण्यासाठी आयोजित इफ्तार पार्टीचे हे विसावे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी दिग्विजय कांबळे, संतोष पाटील, गणेश महाडीक, मारुती वाघ, रमेश शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवडीकरिता कैलास तोडकरी यांचा मुस्लिम मस्जिद व कब्रस्तान ट्रस्ट यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.सालाबादप्रमाणे बंधुभाव वाढवण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे.या कार्यक्रमामुळे समाजातील परस्पर संबंध अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी माजी सरपंच कैलास तोडकरी, युवा नेते दिग्विजय कांबळे, नूरभई तांबोळी, गणेश महाडीक, चांगदेव वरवडे, संतोष पाटील, अमित कोळी, मुबारक शेख, राजू तांबोळी, माधव सुर्वे, किरण खडके, किरण तोडकरी, अतुल गाडे, केतन तोडकरी, यांच्यासह सर्व समाजबांधव उपस्थित होते.























