अक्कलकोट – बोलो भारत माता की जय! हर हर महादेव! सदगुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज की जय! अशा विविध घोषणेचा जय जयकार करीत तालुक्यातील पालापूर आणि रुद्देवाडी येथील राष्ट्रीय संत ॐ हवा मल्लिनाथ महाराज देवस्थान यात्रा महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांच्या पावन सानिध्यात रुद्देवाडी येथील जय भारतलिंग व पालापूर येथील महायुक्तीलिंग हवा मल्लिनाथ देवस्थानच्या वार्षिक यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत विदेशी पार्टी संस्कृतीपासून दूर राहत भारतीय परंपरा, भक्ती आणि देशभक्तीच्या वातावरणात मोठया जल्लोषत साजरी करण्यात आला.
दि.३१ डिसेंबर रोजी रात्रभर देशभक्तीपर भजन, भारूड व भक्तीमय कार्यक्रम झाले असून मध्यरात्री नववर्षाचे स्वागत करण्यात आले.१जानेवारी रोजी पहाटे श्रींची महापूजा व नवग्रह पूजा संपन्न झाले. त्यानंतर सकाळी १० वाजता रुद्देवाडी येथील पाटील वाडा तसेच पालापूर येथील मुलगे वाडा येथून देवस्थानापर्यंत विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आले. रुद्देवाडी येथे देशाच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या जय भारतलिंगाची तसेच पालापूर येथे महायुक्तीलिंगाची स्थापना झाल्याने या परिसरात अध्यात्म, सामाजिक समरसता व राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली आहे. या यात्रा महोत्सवामुळे पंचक्रोशीतील भाविकांना भक्तीमय वातावरणात नववर्ष साजरे करण्याची संधी लाभली असून मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.हा उपक्रम भारतीय संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक जीवनमूल्यांचे दर्शन घडवणारा ठरत असून नववर्षाला मंगल आणि प्रेरणादायी सुरुवात झाल्या असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
रुद्देवाडी येथे दुधनी नगराध्यक्ष म्हेत्रे, आमदार कल्याणशेट्टी यांचे स्वीव सहायक प्रकाश पाटील सह पंचक्रोशीतील सरपंच ग्रामपंचयत सदस्य सोसायटी चेअरमनसह अनिल पाटील, कावळेआदिनी मोठया संख्येत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन आण्णाराव करवीर,हणमंत बिराजदार,शिवशरण करवीर,गुरुशांत आनुर, श्रीशैल पाटील,रमेश बिराजदार,रविकांत पाटील,बसवराज पाटील,नागनाथ कलमनी, रेवप्पा पुजारी,अमसिध्द शेरी,महादेव पुजारी,खाजप्पा कोतली,अमसिध्द शाखापुरे,सिध्दाराम शिंगे,भिमा फुलारी आदिनी परिश्रम घेतले. तर पालापूर येथे सुरेश पाटील, राजेंद्र मुलगे, सुनील कळकुटगे, मल्लिनाथ स्वामीं,सुनील मुलगे, मधुकर पाटील,परमेश्वर बेलेंबे, मल्लिनाथ मुलगे, गुरुशान्त मुनाळे,शंभू स्वामीं आदिनी परिश्रम घेतले.


















