आंधळगाव – महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा मार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव लक्ष्मी दहिवडी व भोसे गावामध्ये नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक निविष्ठा तयार करण्याचे प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षण देण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे आत्मा विभागाचे प्रमुख प्रकल्प संचालक आत्मा डॉ कांताप्पा खोत उपस्थित होते. तसेच कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील शास्त्रज्ञ प्रा विकास भिसे यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी दशपर्णी अर्क व जीवामृत चे प्रात्यक्षिक करून दाखवले. मंडळ कृषी अधिकारी नितीन रणदिवे बालाजी टेकाळे उपस्थित होते. उप कृषी अधिकारी श्री प्रशांत काटे व राजाराम तळेकर उपस्थित होते.
केंद्र सरकारचा महत्वकांक्षी कार्यक्रम राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन 2025 व 2026 दोन वर्षे राबवला जाणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील 5 क्लस्टरची निवड करण्यात आलेली आहे. प्रति क्लस्टर 125 प्रमाणे पाच क्लस्टर मिळून 625 शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. सदर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक निविष्ठा घरच्या घरी बनवून सदर निविष्ठांचा स्वतःच्या शेतीमध्ये वापर करून विषमुक्त अन्न तयार करणे साठी प्रवृत्त करणे. सदर विषमुक्त शेतमालाची प्रमाणीकरण करून विक्रीसाठी प्रोत्साहन देणे असा शासनाचा मानस आहे.
सदर शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे व त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी प्रति क्लस्टर 2 कृषी सखी याप्रमाणे 10 कृषी सखींची निवड करण्यात आलेली आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी सहाय्यक हनुमंत शिंदे चंद्रकला कोरे औदुंबर देवकते यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा श्री विक्रम सावंजी यांनी केले. सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा श्री शैलेंद्र पाटील यांनी आभार मानले.
निसर्गावर आधारित शाश्वत शेतीचा अवलंब करणे बाहेरून निविष्ठा खरेदी न करता स्वतःच्या शेतावर घरच्या घरी पशुधन आधारित निविष्ठा तयार करून विषमुक्त शेतमाल उत्पादित करणे. या शेती पद्धतीमुळे पर्यावरणाचे संवर्धन होईल मातीचे आरोग्य सुधारेल उत्पादन खर्च कमी होवून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
डॉ कांताप्पा खोत प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर
—————-++++++
रासायनिक खतां ऐवजी बीजामृत घन जीवामृत, जीवामृत, गांडूळ खत चांगले कुजलेले शेणखत, रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशक ऐवजी दशपर्णी अर्क निमास्त्र ब्रह्मास्त्र अग्निस्त्र इत्यादी निष्ठाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना कोणत्याही खत दुकानात जाण्याची गरज भासणार नाही.
मनीषा मिसळ तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा
———————+++
मागील पाच वर्षापासून आम्ही सेंद्रिय शेती करत आहोत. आज आम्ही तरुण शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने पपई ढोबळी मिरची ज्वारी हरभरा खपली गहू पिकांचे यशस्वीपणे उत्पादन घेतले आहे. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सहभागी होऊन यापुढे डाळिंब आंबा व सर्व भाजीपाला पिके नैसर्गिक पद्धतीने उत्पादित करण्याचे नियोजन केले आहे.
दादासाहेब लेंडवे आंधळगाव


























