सोलापूर – शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहर उत्तर मधील शरद पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष निशांत सावळे हे शेकडो कार्यकर्त्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी आपल्या सहकारी नागरसेवकांसंवेत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, आणि आता शहर उत्तर मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील युवक भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत, दरम्यान हा प्रवेश झाल्यास शहर उत्तर मधील भारतीय जनता पक्ष आणखी मजबूत होणार आहे.
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्या शहर आणि मतदारसंघ विकासाच्या कामाच्या पद्धतीमुळे सध्या युवकांमध्ये मोठया प्रमाणात क्रेझ असून, अन्य पक्षातील अनेक युवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. येणाऱ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विद्यार्थी अध्यक्ष सोलापुर निशांत सावळे हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अगोदर आणखी कोणकोणत्या घडामोडी घडणार हे पाहावे लागणार आहेत.



















