काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूरच्या जागेवर भारतीय जनता पक्षाला स्थानिक पातळीवरील उमेदवाराची निश्चिती होत नसल्यामुळे सदर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यावा असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य प्रवीण खवतोडे यांनी केली.
2014 व 2019 या मोदी लाटेत खा. शरद बनसोडे व खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना खासदार होण्याची संधी मिळाली. मात्र या मतदारसंघात सत्ता असताना त्यांना भरीव असे काम करण्याची संधी असताना देखील त्यांनी मतदारसंघातील रेल्वे, शेतीची पाणी, पिण्याचे पाणी,बेरोजगारी, उद्योगधंदे, विमान सेवा, पर्यटन आदी प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर काही प्रश्न प्रलंबित ठेवल्याने त्यांच्या नाराजी फटका पक्षाला बसू शकतो.
त्यामुळे सावध पावले टाकली जात आहेत.अशा परिस्थितीत सध्या लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार करण्याच्या तयारीत असलेल्या सत्ताधाय्रांच्या महत्त्वकांशेला सोलापूर लोकसभेत भाजप उमेदवाराबद्दल मतदारांमध्ये नाराजी आहेत. पक्षाने दोन दिवसापूर्वी जाहीर केलेल्या यादीत अद्याप सोलापूरचे नाव निश्चित झाले नाही शिवाय उमेदवारीसाठी अनेकजण नवखे इच्छुक असले तरी अध्याप कोणत्याच नावावर शिक्कामोर्तब होत नसल्यामुळे या मतदारसंघात उपरा उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.