अकलूज – डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबियाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या पक्षात प्रवेश झाला असून पद्मजा देवी मोहिते पाटील यांच्याकडे अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीचची धुरा देण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या अकलूज येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पद्मजादेवी मोहिते पाटील उर्वशीराजे मोहिते पाटील तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, निरीक्षक सुरेश पालवे, जिल्हा युवाध्यक्ष अक्षय भांड माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब शिंदे यांच्यासह जनसेवेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहिते पाटील कुटुंबाचा पक्षप्रवेश सोहळा लवकरच पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लवकरच होईल मात्र सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औपचारिक प्रवेश व स्वागत करण्यात येत आहे. मोहिते पाटील कुटुंब हे पहिल्यापासून बारामतीकर म्हणजेच पवार कुटुंबाशी निगडित आहे मध्यंतरी काही गोष्टी घडल्या परंतु पुन्हा आता त्या दुरुस्त होताना दिसत आहे जनसेवा संघटनेची जिल्ह्याबरोबर राज्यात ताकद असून त्याचा फायदा पक्षाला नक्कीच होणार आहे.
धवलसिंह मोहिते पाटील हे चालते बोलते नेतृत्व असून ते जे मागतील ती जबाबदारी त्यांच्यावर दिली जाणार असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस अकलूज नगरपरिषदेच्या सर्व जागा घड्याळ या चिन्हावर लढणार आहे
या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाबरोबरच सर्वच्या सर्व २६ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलचे सर्व ए बी फॉर्म पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. व नगराध्यक्ष पदासाठी देवयानी सुधीर रास्ते यांचे नाव जाहीर केले उद्या शनिवारी सर्व अर्ज दाखल केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी पद्मजादेवी मोहिते पाटील म्हणाल्या राजकारणात कोणाचे तरी पाठिंबा हवा असतो पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही निश्चित पार पाडू आमच्या सर्वच्या सर्व जागा निवडून येतील अशी आमची खात्री आहे यावेळी जनसेवा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


















