सोलापूर : नीलकंठ को-ऑप. बँकेच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या मोबाईल बँकिंग सेवा, एटीएम, आय.एम.पी.एस, युपीआय(QR code) सेवा तसेच बँकेच्या मुख्य इमारतीचे नूतनीकरण आणि ‘व्हीएलके सेंटर’ (Vision Leadership Knowledge Center) या आधुनिक मीटिंग हॉलचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुजराती मित्र मंडळ सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रिझिजन कॅमशाफ्टचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बँकेचे चेअरमन सीए. धनराज नोगजा, व्हाइस चेअरमन पद्मा भुतडा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन कौस्तुभ करवा, चंद्रकांत तापडिया, जमनादास भुतडा, रमेश राठी, प्रदीपकुमार शिंगवी, आनंद झंवर, शरद कालाणी, अभिजीत चिल्लाळ, नंदा भटृड, किरन शेरखाने, नंदकुमार भोसले, स्वप्नील मर्दा, महेश अग्रवाल, राजगोपाल सोमाणी, अमित मर्दा, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद बलदवा तसेच जनरल मॅनेजर सीए शुभम सोमाणी यांच्यासह संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ पदाधिकारी आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
नीलकंठ को-ऑप. बँकेचे संस्थापक कैलासवासी विश्वनाथ करवा यांच्या विचारांचा वारसा 1997 पासून पुढे चालवत ही बँक खातेदार सभासद आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे सुरू आहे. ग्राहकांना अत्याधुनिक सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न आहे. नव्या सेवांमुळे अधिक सुलभ व जलद बँकिंग सुविधा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच ‘व्हीएलके सेंटर’मुळे बँकेच्या प्रशिक्षण व नियोजन प्रक्रियेला चालना मिळणार असल्याचे बँकेचे चेअरमन सीए धनराज नोगजा यांनी सांगितले.
यतीन शहा म्हणाले, सर्व सुविधा युक्त अत्याधुनिक असे या बँकेचे कार्पोरेट ऑफिस आहे. ग्राहकांना सुलभ हायटेक सुविधा नीलकंठ बँक देत आहे. ही निश्चितच गौरवाची बाब आहे. ग्राहकांना चांगल्या सुलभ सुविधा दिल्यामुळेच या बँकेचा सर्वत्र नावलौकिक आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सूत्रसंचालन मंजुश्री गाडगीळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कौस्तुभ करवा यांनी केले. यावेळी बँकेचे अधिकारी कर्मचारी सभासद खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























