कुर्डूवाडी – कृषीनिष्ठ परिवार माढा यांच्या मार्फत उपळवटे (ता. माढा) येथे दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता द्राक्षबागायतदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा द्राक्ष क्षेत्रातील नव्या संशोधन व मृदा-व्यवस्थापन विषयक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
या विशेष व्याख्यानांसाठी डॉ. आर. जी. सोमकुंवर, माजी संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे, व डॉ. अजयकुमार उपाध्याय, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे, हे द्राक्ष पिकातील नामवंत तज्ञ उपस्थित राहणार आहेत.
या सत्रात द्राक्ष पिकासाठी बदलणारे हवामान, मृदेमध्ये सूक्ष्मजैविक विविधता, बागेतील उत्पादन-स्थैर्य, कार्बन सेक्क्वेस्ट्रेशन, मृदा-आरोग्य सुधारणा, स्मार्ट शेती तंत्रज्ञान आणि निर्यातक्षम उत्पादन या विषयांवर नवीनतम संशोधनाधारित माहिती दिली जाणार आहे.
कृषीनिष्ठ परिवारतर्फे द्राक्ष उत्पादकांना आवाहन करण्यात येते आपल्या बागेची उत्पादकता, गुणवत्ता व नफा वाढवण्यासाठी हे व्याख्यान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी वेळेत उपस्थित राहून या ज्ञानसत्राचा लाभ घ्यावा.


























