वैराग – भारतीय नववर्षाचे स्वागत केवळ परंपरेनेच नाही, तर सामाजिक भान जपून करण्याचा एक नवा आदर्श ‘एकता महिला मंच’ च्या रणरागिणींनी घालून दिला आहे. आज १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याचे औचित्य साधून वैराग येथे महिलांनी ‘जलसाक्षरतेची गुढी’ उभारून निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
पाणी वाचवा – जीवन वाचवा!
केवळ पारंपारिक गुढी न उभारता, भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन ‘पाणी वाचवा-जीवन वाचवा’ असा मूलमंत्र यावेळी देण्यात आला. उपस्थित सर्व सदस्यांनी पाणी बचतीची सामूहिक शपथ घेऊन तो कृतीत आणण्याचा ठाम संकल्प केला.
“एकता महिला मंचाचा निर्धार… जलसाक्षरतेचा जागर!”
या उपक्रमात सहभागी रणरागिणी:
या प्रेरणादायी सोहळ्याला एकता महिला मंचच्या खालील पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या:
प्रगती कासार
सुचेता कासार
दीप्ती गायकवाड
विजया कासार
रत्नप्रभा गायकवाड
वैशाली गोवर्धन
जयश्री सोपल
कुसुम कासार
विभावरी कुलकर्णी
शोभा मस्के
नंदा देशमुखे
मीनाक्षी कासार
शकुंतला दीक्षित
सौ. साळवे
जया एखंडे
संध्या जाडकर
यांच्यासह मंचाच्या इतर अनेक सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या या उपक्रमाचे संपूर्ण वैराग परिसरातून कौतुक होत आहे.
























