किनवट / नांदेड : मौजे मांडवा येथे आज किनवट पोलिस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. मांडवा गावातील अवैध दारूविक्री, परस्परांतील वादविवाद तसेच विविध स्थानिक अडचणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कराड यांनी महिलांना आणि ग्रामस्थांना सुरक्षिततेबाबत विशेष दिलासा देत आवश्यक ती कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ. सागरताई शिंदे-पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पी.आय. गणेश कराड उपस्थित होते.
या वेळी मांडवा बिटचे जमादार पुरी साहेब, प्रकाश बोधनकर तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते. मंचावर ग्रामसेवक आरमाळकर, सरपंच सौ. सुनिता आत्राम, रामू धर्वे, राजू मेसावार, बालाजी गिटे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला-पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाशी मुक्त संवाद साधत विविध समस्या मांडल्या. कराड यांनी त्या लक्षपूर्वक ऐकून तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन दिल्याने गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.























