पंढरपूर – नव्याने सुरू झालेल्या पंढरपूर -हैद्राबाद- तिरुपती साप्ताहिक रेल्वेगाडीस ग्राहक पंचायतीतर्फे हिरवा झेंडा दाखविण्यात आला.यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे रेल्वे इंजिनचे पूजन करून रेल्वेच्या चालक, स्टेशन प्रबंधक, व इतर अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक रविवारी रात्री ८ वा. पंढरपूर येथून हैद्राबाद मार्गे तिरुपतीला जाणाऱ्या साप्ताहिक विशेष रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आले. प्रवांशानी चांगला प्रतिसाद दिला तरच ही गाडी पुढे कायमस्वरूपी चालू राहिल.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे शुभेच्छा देण्यासाठी रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीचे सदस्य विनोद भरते, अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, उपाध्यक्ष विनय उपाध्ये,पंढरपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सहसचिव आझाद अल्लापूरकर, सदस्य सतिश निपाणकर, विनोद शेंडगे, वैशाली शेंडगे, प्रशांत काकडे, स्थानिक सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य सुरेश लाड, स्टेशन प्रबंधक के. के. मिश्रा, चनगौडर,वाणिज्य प्रमुख अमोल जोशी, रेल्वे चालक सुब्रत गांगुली, सत्येंद्र प्रसाद, तिकीट निरिक्षक व प्रवासी उपस्थित होते.



























