तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन : भोकरदन ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी विविध मागण्याचे निवेदन येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सन २००५ पासून कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांच्या विविध मागण्या संदर्भात दि. १४ मार्च २०२४ रोजी दहा वर्षापेक्षा जास्त सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करून असे शासन निर्णय निघाले परंतु त्या शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही.
शासन निर्णय निघून जवळपास १८ महिने उलटले परंतु एकूण ६९ संवर्गापैकी फक्त दोन संवर्गाची समायोजन झाले आणि बाकी तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी यांच्या समाजाची प्रक्रिया खूप विलंब होत आहे. वेतन वाढ वार्षिक वेतन वाढ विमा सुरक्षा एच आर पॉलिसी अशा विविध स्वरूपाच्या मागण्यासाठी १० आणि ११ जुलै रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करून मा. आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन सुद्धावरील मागण्या मान्य होत नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांनी पुकारलेल्या १९ ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद मध्ये ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथील सर्व विभागातील कंत्राटी कर्मचारी सहभागी होत आहे. अशा प्रकारचे निवेदन आज देण्यात आले या निवेदनावर ग्रामीण रुग्णालयातील सर्वच कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या होत्या अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य राज्य समन्वयक यांनी दिली