सोलापूर : संस्कार, संस्कृती आणि ज्ञान देणारी संस्था म्हणजे एन. के. किड्स स्कूल असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी बाळे येथील एन. के. किड्स स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयशा. इनामदार, संतोष कुमार घोडके, अमोल ढेपे, राजाभाऊ अलुरे, संस्थेच्या प्रिन्सिपल श्वेता कस्तुरे, अमोल घाडगे, मनोज देवकर, मंजुषा डोईफोडे व संस्थेचे अध्यक्ष विकास कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कै. नागेश करजगी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच पालक प्रतिनिधींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हेड शिक्षिका दिपाली कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी भगरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी शिंगण, पुनम कळसाईत, सेविका संगीता हेगडकर व सुरेखा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थी व स्कूलचा परिसर सुरक्षित रहावा या दृष्टीने स्कूलचे पालक सचिन पिसके व शुभांगी पिसके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पिसके परिवाराने स्कूलसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट देत सुरक्षिततेच्या दृष्टीने मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमास पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.























