पंढरपूर – येथील सृष्टी आणि वरद बडवे व त्यांच्या अन्य भावडांनी मिळून पर्यावरण पुरक साहित्य वापरुन यावर्षी किल्ले लोहगडची प्रतिकृती साकारली आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून सृष्टी आणि वरद दरवर्षी दिवाळी मध्ये विविध गडकोट किल्ल्यांची प्रतिकृती साकारत असतात. या वर्षी विविध सामाजिक संदेशा बरोबरच त्यांनी साकारलेल्या लोहगड किल्याच्या प्रतिकृतीवर चक्क विठ्ठल मंदिर परिसरात होणाऱ्या संभाव्य काँरिडोरला विरोध करणारे फलक देखील झळकाविले आहेत.
पंढरपुरातील पर्यावरणाची सेवा करणारे सृष्टी बडवे आणि वरद बडवे ही भावंडे गेली अनेक वर्षे पर्यावरणाची सेवा करीत आहेत. पर्यावरणाच्या सेवे बरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरण विषयी जनजागृती करण्याचा देखील त्यांचा विविध सणसुदीच्या, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी तसेच वर्षभरातील विविध उत्सवाचे तसेच राष्ट्रीय उत्सवाचे ओचित्य साधुन नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. पर्यावरणाच्या सेवे बरोबरच दिवाळी सुट्टीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले याची प्रतिकृती करण्याचा छंद देखील गेली अनेक वर्षे ते जोपासत आहेत.
यावर्षी या बहिणभावाने किल्ले लोहगडची हुबेहुब प्रतिकृती साकरण्याचा प्रयत्न केलेला आहे. या त्यांच्या कार्यात त्यांचे इतर भावंडांनी देखील त्यांना मोठी मदत केलेली आहे. लोहगड साकारताना त्यांनी पर्यावरण पूरक साहित्यांचा वापर केलेला आहे. हा किल्ला किंवा गडकोट साकारताना त्यांनी शेतातील काळी माती, गाईचे शेण, दगड, धोंडे याचा सर्रास वापर केलेला आहे.
विशेष म्हणजे किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी ही भांवडे स्वतः बिजारोपण करून घरात वाढवलेली खास विविध प्रकारच्या फळे,फुले तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मोलाचे ठरणारी रोपे भेट देतात.
———————-
कॉरिडॉरचे फलक किल्यावर
सध्या पंढरपूर मध्ये विकासाच्या नावाखाली होणारा संभाव्य कॉरिडॉर त्यामुळे लोक भयभीत चिंताग्रस्त आहेत म्हणून आपली व्यथा बोर्डामार्फत मांडून सरकार पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न वरद सृष्टी बडवे यांनी केला आहे. वरद सृष्टीचे भाऊ आर्यन, श्रेयस सृजन ध्रुव शौर्य यांचे पण त्यांनी पण किल्ला करण्यात मदत केली बडवे.
———————
किल्ला साकरण्यासाठी वापरेलला मातीचा पुर्नउपयोग
गडकोट किल्ले तयार करण्यासाठी वापरलेली काळी माती ही छत्रपतींचे पदस्पर्शाने पवित्र झालेली असते.त्यामुळे हीच काळी माती आपल्या पर्यावरणच्या कामासाठी, बिजारोपण करून रोपे तयार करण्याच्या कामी वापरली जाते. या बिजारोपणातून तयार झालेली विविध प्रकारच्या फुलां, फळांच्या रोपा बरोबरच पिढ्यान पिढ्या सावली देवून पर्यावरण पुरक झाडांच्या रोपांचे योग्य ठिकाणी वृक्षारोपण करणे अथवा तयार केलेली रोपे समाजात वाटण्यासाठी खास त्यांच्या या किल्याच्या बांधणीसाठी वापरलेल्या मातीचा एक प्रकारे पुर्नवापर केला जातो.
————————
भारतीय वीर जवानांसाठी मदत
येथील सृष्टी आणि वरद बडवे या बहिणभावाने मिळालेली लोकवर्गणी व स्वतःला मिळालेली बक्षीस्वरूपी रक्कम स्वत:साठी कधीही वापरत नाहीत. तर हे पैसे ते सीलबॉक्स करुन तो बॉक्स साकारलेल्या किल्ल्यासमोर ठेवलात. किल्ला पाहण्यासाठी येणारे जाणारे लोक त्या बॉक्समध्ये पैसे टाकतात व जी काही जमेलेली रक्कम भारतीय सैनिकांसाठी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा देखील त्यांचा संकल्प आहे.


















