सोलापूर – सोमवारी उत्तर सोलापूर पंचायत समिती आरक्षण सोडत जुने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे पार पडला. उत्तर सोलापूर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट तर सहा पंचायत समिती गणांचा समावेश आहे.
या आरक्षण सोडतीत तालुक्यातील नान्नज जिल्हा परिषद गट सदस्य पदाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण जाहीर करण्यात आले. यावर्षीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या कोंडी व बीबी दारफळ सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध झाले.तर पंचायत समिती सदस्य पदाकरिता अनुसूचित जाती लोकसंख्या नुसार मार्डी पंचायत समिती गण अनुसूचित जाती करिता निश्चित करण्यात आला. उर्वरित पाच गणातून चिट्टीद्वारे वडाळा पंचायत समिती गण हा ना. मा.प्र महिला (ओबीसी) साठी आरक्षित झाला. नान्नज, कोंडी पंचायत समिती गणाकरिता सर्वसाधारण आरक्षण सोडत निश्चित मानले गेले. बीबीदारफळ व ति-हे पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत जाहीर झाले.
यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी गणेश निराळे, उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील, उत्तर पंचायत समिती गटविकास अधिकारी राजाराम भोंग, मंडल अधिकारी प्रवीण घम यांची प्रमुख उपस्थिती होती. मोठ्या गटातील विद्यार्थिनी अन्यथा वाघमोडे हिने आरक्षण सोडत चिट्टी काढली.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आरक्षण सोडत जाहीर झाल्याने माजी आमदार दिलीप माने गट राष्ट्रवादी माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे गट, भाजपाचे शहाजी पवार, माजी आमदार यशवंत माने, बाजार समिती संचालक अविनाश मार्तंडे व इतर राजकीय पक्षांची राजकीय भूमिका निर्णय ठरणार आहे . तर उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहे.
चौकट
पंचायत समिती गण आरक्षण
नान्नज – सर्वसाधारण
वडाळा – ना म प्र (ओबीसी)महिला
दारफळ बी बी – सर्वसाधारण महिला
मार्डी – अनुसूचित जाती
कोंडी – सर्वसाधारण
तिऱ्हे – सर्वसाधारण महिला
जिल्हा परिषद गट आरक्षण
दारफळ बीबी – सर्वसाधारण
नान्नज – ना म प्र (ओबीसी)
कोंडी – सर्वसाधारण