विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये, शैक्षणिक ” संस्थांना दरवर्षी वार्षिक गुणवत्ता हमी अहवाल (एक्यूएआर) पाठविणे अनिवार्य आहे. मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित ४०५ पैकी केवळ ५० महाविद्यालयांनीच एक्यूएआर विद्यापीठाकडे पाठविला आहे. परिणामी विद्यापीठाच्या वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची छायांकित प्रत पाठविण्याबाबत ३५५ महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ९५ च्या तरतुदीनुसार सर्व संलग्नित महाविद्यालये, संस्थांना वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची प्रत विद्यापीठाकडे पाठविणे क्रमप्राप्त आहे. तसेच व्यावस्थापन परिषदेच्या प्राप्त निर्देशानुसार महाविद्यालयांनी एक्यूएआर बंगळुरू येथे नॅक कार्यालयाकडे सादर केल्यानंतर तीन महिन्याच्या आत विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक ६ आहे. परंतु अमरावती विद्यापीठाशी संलग्नित ४०५ महाविद्यालये असून त्यापैकी ३८० महाविद्यालये ‘नॅक’मध्ये समाविष्ट आहेत. असे असताना आतापर्यंत – केवळ ५० महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे एक्यूएआर सादर केले आहे. त्यामुळे उच्च शिक्षणात नियमावली, कायद्याची कशी वाट लावली जात आहे, हे दिसून येते. अनुदानित महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांना यूजीसीकडून अनुदान प्राप्त होते. मात्र, यूजीसीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात ढकलगाडी का? असा सवाल उपस्थित होत आहे.



















