तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आढावा बैठक ओमकार गार्डन मंगल कार्यालयात प्रदेश सचिव यांच्या नेतृत्वाखाली या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गट) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगांवकर यांनी भाषणाच्या सुरुवातीला नांदेड जिल्ह्यांतील मुखेड तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीत मृत्यू पावलेल्यालांना सर्व प्रथम भावपुर्ण आदरांजली देण्यात आली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगीतले आहे की पक्षात काम करीत असताना नविन जुने गट-तट करू नका पक्षवाढीसाठी काम करा तळागाळातील कार्यकर्त्या पासुन ते पदाधिकाऱ्यांपर्यत सर्व जन एक जुटीने काम केलात तर आगामी जिल्हा परिषद निवडणूक ग्राम पंचायत निवडणूक आणि नगर परिषद निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवल्या शिवाय राहणार नाही.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालूका व शहर कार्यकारणी बरखास्त करण्यात येत आहे आणि लवकरच नवीन कार्यकारणी निवड करण्यात येईल असे रावणगावकर यांनी आढावा बैठकीत सांगीतले.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दादाराव पाटील ढगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती पण या बैठकीला मुदखेड तालुका अध्यक्ष यांच्या सह निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्याने या आढावा बैठकीकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...