सोलापूर – लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीला लायन अॅड. श्रीनिवास कटकुर रिजन चेअरमन यांची क्लबला अधिकॄत भेट दिनांक २३/११/२५ वार रविवार रोजी सकाळी ठीक ११/०० वाजता हॉटेल ग्रीनवुड रिसॉर्ट सोरेगाव विजापूर रोड सोलापूर क्लब भेटीला येत आहेत.
यावेळी लायन्स इंन्टरनॅशनल प्रथेप्रमाणे ‘माजी अध्यक्ष महिना” लायन्स क्लब ऑफ है सोलापूर व्टिन सिटीचे सर्व माजी अध्यक्षांचा अॅड लायन श्रीनिवास कटकुर यांच्या शुभहस्ते सन्मान होणार आहे. तसेच लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटी क्लबला त्यांची अधिकृत भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या शुभहस्ते विविध सेवाकार्य करण्यात येणार आहे.
यावेळी प्रांताचे माजी प्रांतपाल एम जे एफ लायनडॉ नारायणदास चंडक, अध्यक्षा लायन डॉ कॄष्णा चंडक, झोन चेअरमन लायन सोमशेखर भोगडे, रिजन सचिव लायन चंद्रकांत यादव, कॅबिनेट ऑफिसर एम जे एफ लायन डॉ राहुल चंडक, लायन मुकुंद जाधव आणि सर्व सन्मानीय लायन सदस्य उपस्थित राहणार आहेत. असे आव्हान क्लबचे सचिवा लायन नंदिनी जाधव यांनी केले.




















