माळशिरस – तालुक्यातील चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्याने दिवाळीसाठी दुसरा हप्ता 205 रुपये जाहीर केला आहे.यापूर्वी कारखान्याने 2800 रुपये एवढा पहीला हप्ता दिला होता यामुळे 3005रुपये तर फेब्रुवारी महीन्यात गाळपास आलेल्या ऊसास 3105 एवढा उच्चांकी दर ओंकार साखर कारखान्याने शेतकऱ्यांना दिला आहे.
कारखान्याने शेतकरी हा केंद्र बिंदु मानुन तसेच कोणत्याही प्रकारचे उपक्रम पदार्थ नसताना सुद्धा कारखान्याने शेतकऱ्यांचे हित जोपासत 2024_25 च्या हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर दिला असल्याचे कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी सांगीतले.
सदरचा कारखाना चेअरमन बाबुराव बोञे पाटील, संचालिका रेखाताई बोञे पाटील, संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण असुन पुढील हंगामात सुद्धा शेतकऱ्यांनी आपण या कारखान्यासच ऊस देणार असल्याचे सांगीतले.या कारखान्याने शेतकऱ्यांना व वाहनधारकांना दिलेला शब्द पाळला आहे.याबद्दल शेतकऱ्यांकडून चेअरमन बाबुराव बोञे पाटील व संचालक मंडळाचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
ऊस उत्पादक शेतकरी ,वाहनधारक व कामगार यांना कारखान्याकडुन जे देणे शक्य आहे ते सर्व देण्यास कारखाना कटिबद्ध आहे
– चेअरमन बाबुराव बोञे पाटील

















