थडीसावळी ग्रामपंचायतच्या वतीने लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी
————————————————
बिलोली (तालुका प्रतिनिधी)
बिलोली तालुक्यातील थडीसावळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती दि.१ ऑगस्ट २०२४ गुरूवार रोजी साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवचंदन अनपलवार यांच्या शुभहस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी युवराजसिंह चव्हाण,रविंद्रसिंह चव्हाण,संतोष नाईक,रूद्रुअप्पा मठपती,लक्ष्मण सिदमलवाड,मोहन कांबळे,मारोती चमकुलवार,हाणमंत भंडारे,आनंदा येडलेवार,किरण भंडारे,अनिल भंडारे,चंद्रकांत गुरूजी,संदिप भंडारे,सायबू येडलेवार,सुनील भंडारे,संदिप भंडारे,शिवाजी बोयनर,कर्मचारी गौतम काळे आदी उपस्थित होते.