मुदखेड ता प्र
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, 12 तास थ्री फेज लाईन मिळावी व सिंगल फेस शेतात मिळावी या मागण्यासह अनेक मागण्या घेऊन शेतकऱ्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सकाळी बारा वाजता स्व बाळासाहेब ठाकरे चौकातून रुमणे मोर्चा काढण्यात आला व तो मोर्चा मुदखेड तहसीलवर नेण्यात आला यावेळी मोर्चात 200 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते हा मोर्चा तहसील प्रांगणात गेल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केला.
केंद्र सरकार उद्योगपत्यांचे कर्ज माफ करत आहे पण शेतकर्यांची कर्जमुक्ती करत नाही, हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे.
अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस कमिटी चे जिल्हा अध्यक्ष बी आर कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी प्रदेश सचिव श्रावण रॅपनवाड, जिल्हा अध्यक्ष बी आर कदम, तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, शहर अध्यक्ष कैलाश गोडसे,महमद गौस,
राजबहादुर कोत्तावार, जिल्हा सचिव माधव हामंद डोणगांवकर, युवक शहर अध्यक्ष मुजीब पठाण, युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बालाजी गाडे, करीम खासाब, सूर्यकांत चौदंते,अतिक अहमद, अविनाश चौदंते, यासह आदी काँग्रेस कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटी मुदखेडच्या वतीने तहसीलदार आनंद देऊळगांवकर यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या रूमणे मोर्चात पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.