करमाळा – आगामी करमाळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप गट प्रचंड ऍक्टिव्ह मोडवर असल्याचे दिसून येत आहे . इच्छुकांकडून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या कडे भेटीचा ओघ वाढला असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कार्यकर्तेआपली इच्छा व्यक्त करू लागले आहेत . तसेच आपल्या उमेदवारीच्या सक्षम पणाचे व योग्यतेचे दाखले देत आहेत .नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार जगताप यांच्या पत्नी सह जवळपास अर्धा डझन हुन अधिक महिलांची नावे चर्चेत आहेत .नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर सध्या मतदार यादी अंतिम होणेकडे वाटचाल सुरू आहे .तसतसे इच्छुक उमेदवारांच्या हालचालींचा वेग ही वाढला आहे .इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह माजी आमदार जगताप यांची भेट घेऊन आपल्या उमेदवारीची दावेदारी करत असल्याचे चित्र जगताप गटात दिसत असल्यामुळे सध्या करमाळा शहरात जगताप गट प्रचंड ऍक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसत आहे .नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर झाले व त्यानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी सौ नंदिनीदेवी जगताप यांचे नाव चर्चेत आले .दस्तर खुद्द माजी आमदार जगताप यांच्या धर्मपत्नीचे नाव चर्चेत आल्यानंतर शहरातील राजकीय माहोल जगताप गटासाठी प्रचंड अनुकूल झाल्याचे व सकारात्मक बदल झाल्याचे तीव्रतेने जाणवत आहे .त्यामुळे प्रभाग निहाय इच्छुकांचा ओढ जगताप गटाकडे वाढला आहे .जगताप गटातून नगराध्यक्ष पदासाठी सौ नंदिनीदेवी जयवंतराव जगताप यांचे सह अग्रक्रमाने माजी नगरसेविका संगीता श्रेणीककुमार खाटेर,श्रीमती वंदना नारायण ढाळे, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी यांच्या पत्नी सौ शबाना अल्ताफ तांबोळी,माजी उपनगराध्यक्ष ॲड कमलाकर वीर यांच्या पत्नी सौ स्वाती कमलाकर वीर ,माजी नगराध्यक्षा सौ पुष्पा हनुमंत फंड, सौ विद्या विलास चिवटे,माजी नगरसेविका सौ शारदा बाळनाथ राखुंडे यांची नावे चर्चेत आहेत .परंतु कुटुंबातील महिलेला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी द्यायची कि पार्टीतील अन्य एखाद्या सक्षम महिलेला उमेदवारी द्यायची याचा अंतिम निर्णय माजी आमदार जगतापच घेणार आहेत .माजी आमदार जगताप यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा व निर्णयाचा थांग पत्ता त्यांनी जाहीर करेपर्यंत कोणालाच लागत नाही हे त्याहून आणखी विशेष .त्यामुळे आगामी काळातील माजी आमदार जगताप यांचे निर्णयाकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे .
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...