तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर : श्रावण महिन्यातील सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरातील मेघडंबरीस ३०० किलो फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. सोमवारनिमित्त मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ओम नम: शिवायच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
सिध्देश्वर मंदिरातील योग समाधीच्या मेघडंबरीस दर सोमवारी आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते. यंदाच्या पहिल्या सोमवारीह यानिमित्ताने मेघडंबरीस आकर्षक सजावट करण्यात आली होती.
मेघडंबरीच्या सजावटीसाठी झेंडू, शेवंती, चिनी गुलाब, सुपारी फुल, गुलाब अशी विविध फुले वापरण्यात आली. मेघडंबरीच्या कळसाला साकारण्यात आलेली महादेवाच्या पिंडीची व शेषनाग फणीची प्रतिकृती आकर्षक दिसत होती.
सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिर व समाधी स्थळ गजबजले होते. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग मंदिरात लागली होती.योग समाधीची विधीवत पूजा अर्चना करण्यात आली. मंदिरात पहाटे चार वाजल्यापासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. यावेळी मंदिरात सिध्देवर महाराज यांची हुबेहुब छबी दिसणारी आकर्षक रांगोळीही काढण्यात आली होती. भाविक यावेळी मंदिरात सेल्फी घेत धार्मिक उत्सावात सहभागी होत मनोभावे भक्तीत तल्लीन होताना दिसून आले.
Post Views: 10