अक्कलकोट – मैंदर्गी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक साठी १७ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगर अध्यक्षपदासाठी एक व सदस्यपदासाठी ३० नामनिर्देशनपत्र प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्जुन सुरवसे यांनी दिली.
सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी भाजपा तर्फे नगराध्यक्ष साठी अंजली योगीनाथ बाजारमठ यांनी अर्ज केला tar
सदस्य साठी ३० अर्ज दाखल झाले .यामध्ये रामपुरे प्रवीण गुरुनाथ (1अ) ,नागुर महानंदा सुरेश (2 अ), शावरी राणी महेश (2 अ), रायचूरे भौरम्मा शिवानंद (2 अ), गोब्बुर गुरनिंगप्पा शरणप्पा (2 ब),देगील विनायक सिद्धाराम (३ अ), मुन्नोळी विनायक सिद्धाराम (३अ), अखतरबानू म.हनीफ देगाव (३अ), निंबाळ राजश्री रामचंद्र (३ब), सोनकांबळे सीमा राहुल (४अ), भंगरगी भारती सिद्धेश्वर (५ अ),पाटील सावित्री गुरुकृपा (५ब),गोबुर सुरेखा गुरुनिंगप्पा (५ ब),देगाव अख्तरबानू म.हनिफ (६अ), शमीमबानू मेहबुब दफेदार (७अ),करजगी मुत्तण्णा आडव्याप्पा (७ब)
करजगी चंद्रकांत मुत्तण्णा (७ब),दिवटे मनीषा चंद्रशेखर (८अ),चव्हाण सुनंदा कृष्णात (८अ), दिवटे चंद्रशेखर सिद्रामप्पा (८ब) मोरे संजीव हनुमंत (८ब),खंबत पार्वती शरण बसप्पा (९अ), गौडगाव बनशंकरी शिवपुत्रप्पा (९अ), म्हेत्रे मल्लिनाथ लक्ष्मण (९अ), जकापुरे देवेंद्र काशिनाथ (९ ब), निवर्गी समर्थ चिदानंद (९ब),नागप्पा शिवपुत्र गौडगाव (९ब), शावरी राणी महेश (१०अ), नागुर सिद्धाराम नागप्पा (१० ब),संतोषी सूर्यकांत आलूरे (३ब) आदी ३० urj दाखल झाले. मैंदर्गी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत एकूण सदस्य पदासाठी एकूण ८४ अर्ज दाखल झाले असून नगर अध्यक्षपदासाठी आठ अर्ज दाखल झाले.
मैंदर्गी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी स्थानिक गटाकडून माजी नगरसेविका शिवम्मा यल्लप्पा पोतेनवरू यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे तर भाजपा कडून नगराध्यक्ष पदासाठी अंजली योगिनाथ बाजारमठ निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी स्थानिक गटाच्या शिवम्मा यल्लप्पा पोतेनवरू विरुद्ध भाजपाच्या अंजली योगिनाथ बाजारमठ अशी लढत होणार आहे. या ठिकाणी शिंदे शिवसेना व काँग्रेस यांनी स्थानिक गटाला पाठिंबा दिला आहे.


















