नांदेड – सिडको येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास संविधान दिनानिमित्त दिनांक २६ नोव्हेंबर २०२५
रोजी महिला मंडळ व परिसरातील समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करून संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.तर सांची बुद्ध विहार संभाजी चौक सिडकोच्या वतीने संविधान रॅली सिडकोच्या मुख्य रस्त्याने काढण्यात आली.
लोकशाहीच्या आत्मा समजले जाणाऱ्या संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२६ हा दिवस भारतीय इतिहासाचा स्वर्ण दिवस म्हणायला काही हरकत नाही. तो राष्ट्राच्या विचारसंस्कृतीला, नागरिकत्वाची गुणवत्ता, समाजाची नैतिकता आणि लोकशाहीचे आधारस्तंभ यांचे पुनर्मूल्यांकनांची आठवन करून देतो. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको येथे सिडको हडको परिसरातील महिला मंडळ व उपासक, उपासिका, बालक, बालिका यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या अभिवादन करून संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
यावेळी महिलांनी संविधानाविषयी आपले मनोगत ही व्यक्त केले तर राहुलनगर वाघाळा येथिल जेष्ठ उपासक मारोती कांबळे यांनी संविधानावर सविस्तर माहिती दिली. याचवेळी सिडको येथील सांची बुद्ध विहार समितीच्या वतीने संविधान रॅली सिडकोतील मुख्य रस्त्याने काढण्यात आली.
यावेळी सिडको हडको परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे घेण्यात आलेल्या संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रदीप हनवते यांनी केले होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका सुजाता आढाव, कविता उघडेराव, वैशाली वाडे, सुनंदा दुधाटे, निरंजना लांडगे, ममता लांडगे, थोरात बाई, सूर्यवंशीबाई, सरपाते काकू, हटकर ताई, यांच्यासह मारुती कांबळे, विलास गजभारे, डि.के. कांबळे, बालाजी गायकवाड, गौतम जमदाडे, गोडबोले मामा यांच्यासह पत्रकार संभाजी सोनकांबळे यांची उपस्थिती होती.

















