सोलापूर : सालाबादप्रमाणे दीपावलीनिमित्त प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आणि मिठाई वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या व्यथा, वेदना व अडचणी सोलापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. सोलापूर महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत जाधव यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी, भारत बाबरे, सफाई अधीक्षक अनिल चराटे , मुख्य सफाई आरोग्य निरीक्षक नरसिंह बच्चू, आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार, आरोग्य निरीक्षक सचिन वडवेराव, आरोग्य निरीक्षक पद्मावती इंगळे, आरोग्य निरीक्षक सचिन कदम, आरोग्य निरीक्षक रोहित गवळी, पी.बी. ग्रुप प्रमुख गौतम चंदनशिवे, अविनाश भडकुंबे, नितीन बंदपट्टे, चंद्रकांत सोनवणे, पी.बी. ग्रुप अध्यक्ष बाबा गायकवाड, आदित्य चंदनशिवे, गौतम नागटिळक, मनोज थोरात, अनिस सय्यद, गौतम शिंदे, अजय इंगळे, विकी माळाळे तसेच महापालिकेतील सफाई कर्मचारी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा : पवार
महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विणा पवार म्हणाल्या, सोलापूर शहरात 12 लाख नागरिकांची सेवा सोलापूर महानगरपालिकेतील 2 हजार सफाई कर्मचारी करीत असतात. हे लक्षात घेऊन नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन केले. सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले म्हणाले, महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा दिवाळीनिमित्त सन्मान व मिठाईवाटप उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.


















