वेळापूर – येथे महाशिवरात्रीनिमित्त अर्धनारी नटेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
महाशिवरात्रीनिमित्त हजारो वर्षांची परंपरा असलेल्या श्री अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरात देवाचे पुजारी रविराज गु र व यांनी पहाटे जलाभिषेक महापूजा व आरती केली. त्यानंतर अर्धनारी नटेश्वराच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. देवाच्या समोर नंदीजवळ ग्राम जोशी विवेक जोशी, मन्मथ स्वामी व महेश स्वामी यांनी भाविकांचे अभिषेक घातले.
आमदार उत्तमराव जानकर यांच्या सुविद्य पत्नी व नूतन पं. स. सदस्या सौ विमलताई जानकर यांनी अर्धनारी नटेश्वराचे दर्शन घेतले. अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरामध्ये देवाच्या गाभाऱ्यात व बाहेर फुलांची सजावट करण्यात आली होती. त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशी रांगोळी व मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी अर्धनारी नटेश्वराचे दर्शन घेतले.
भाविकांना अर्धनारी नटेश्वर अन्नछत्र मंडळाच्यावतिने भाविकांना खिचडी, सरबत, चहाचे वाटप करण्यात आले. महाशिवरात्री उत्सवानिमित्त मंदिर परिसरामध्ये वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता. महाशिवरात्र उत्सव सोहळा पार पाडण्यासाठी गौरीहर गुरव, सतीश गुरव, रविराज गुरव, मयूर गुरव, प्रणव गुरव, पार्थ करमाळकर, सोहम वाघे, अनिकेत शिंदे, अभिराज होडगे, वैभव वाघे, अविनाश खराडे, ओंकार होडगे, बाळू खंडागळे, करन उरणे, गणेश मेहत्रे, विनोद रणवरे, अतुल गोडसे, पप्पू पिसे, आदींनी परिश्रम घेतले.

























