पंढरपूर – महाशिवरात्री निमित्त दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्रौ १२ वाजता श्री विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग असल्याने त्याची षोडशोपचार पूजा विधीवत करण्यात आली.
सदरची पूजा मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संपन्न झाली. या पूजेसाठी होळकर संस्थानतर्फे काशी येथून पवित्र गंगाजल उपलब्ध करून देण्यात आले होते.
या पवित्र पूजेच्या वेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी व कर्मचारी उपस्थित होते.


























