Sunday, February 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त मातीत रंगला कुस्त्यांचा फड, महिला कुस्तीपटू देवयाणी माने यांनी पुरुष मल्लाला चारवली धुळ

तरुण भारतbyतरुण भारत
November 11, 2025
in marathwada
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देगलूर / नांदेड : तालुक्यातील नरंगल (बु) येथे भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त यंदा गोविंद शंकरराव पाटील यांच्या शेतात काळ्या मातीत कुस्त्यांचा फड चांगलाच रंगला होता. या कुस्त्यांच्या फडात पालमचा आबु चाऊस आणि उदगीरचा निरज वाघमारे यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला तर द्वितीय क्रमांक जय चाऊस, तृतीय क्रमांक गजानन जाहूरकर आणि आयुब शेख यांनी पटकावले. यात यवतमाळची महिला कुस्तीपटू देवयाणी माने यांनी पुरुष कुस्तीपटूला धुळ चारत उपस्थितांना आश्चर्यचकित केले.

काळ्या मातीतील कुस्त्यांचा फडाचे उद्घाटन उत्कृष्ट कुस्तीपटू तथा देगलूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती मुंडे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्रुदेव पवार यांच्या हस्ते करण्यात आली तर शेवटच्या कुस्तीचे बक्षीस वितरण पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे म्हणाले की, नरंगलकरांनी कुस्तीचे सामने घेत भारतीय खेळाला चालना दिली आहे. कुस्तीपटूंनी केवळ स्पर्धा जिंकण्यापुरते मर्यादित न राहता राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उज्ज्वल करावे असे सांगितले.

दरम्यान ही स्पर्धा दुपारी बारा ते सायंकाळी साढेसातच्या दरम्यान घेण्यात आली. या स्पर्धेत अतिशय चांगल्या कुस्तीपटूने सहभाग घेतला होता त्यावेळी ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली, अंतीम कुस्ती पालमचा आबु चाऊस आणि उदगीरचा निरज वाघमारे यांच्यात कुस्ती रंगली, ही लढत अत्यंत चुरशीची होती. शेवटी पंचांच्या निर्णयानुसार शेवटची कुस्ती विभागून देण्यात आली. तर या स्पर्धेत यवतमाळहून आलेली महिला कुस्तीपटू देवयाणी माने हीने पुरुष कुस्तीपटूला धूळ चारीत अवघ्या दोन मिनिटांत विजयावर शिक्कामोर्तब केले.

मागील दोन वर्षांपासून नरंगल (बु) येथे बंद पडलेल्या कुस्त्याचा फडाला गावकऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा चालू करण्यात आले. या फडासाठी गावातील तरुणांबरोबरच पंचक्रोशीतील लोकांनीही सहकार्य आणि मदत केली. तर महाराष्ट्रातील दर्जेदार कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवित चालना दिली. यंदा महाराष्ट्रातील उदगीर, लातूर, नळेगाव, पुसद, यवतमाळ, संभाजीनगर, कुर्डुवाडी, सोलापूर, पुणे, हिंगोली, मुखेड या ठिकाणासह तेलंगाणा आणि कर्नाटक राज्यातील कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला. तर कुस्त्यांच्या फडासाठी विरभद्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, महात्मा बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नरंगलचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव गोविंदराव पाटील यांच्यास्मरणार्थ 14051 रु., कै. इरवंतराव लिंगप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ 11000/- रू., कै. मोहम्मद नवाज पो. पटेल यांच्या स्मरणार्थ 5100/- रू., कै. गणपतराव राजेप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ 5001/- रू, कै. रंजिता मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ 5001/- रू तसेच श्री शंकर शिवलींगराव म्हेत्रे तमलूरकर यांच्यातर्फे 11551/- रू., श्री भुमन्ना नरसिंग गाडगे शहापुरकर यांच्या तर्फे 7000/- रू., श्री डॉ. आनंद नरंगलकर यांच्या तर्फे 5000/- रू, श्री. सतीश तारकांत पाटील यांच्याकडून रु. 5000/-, श्री रामराव विठ्ठलराव वाघमारे नंदूरकर यांच्या तर्फे 5000/- रू., श्री प्रा. नरेंद्रकुमार विठ्ठलराव वनंजे तमलूरकर कथा तर्फे 5000/- रू., तलाठी श्री संतोष राचन्ना पाटील यांच्या तर्फे 5000/- रू, सरपंच सौ. शोभा अरविंद कर्णे यांच्या तर्फे 5000/- रू. श्री गजानन रामराव तंबाके यांच्या तर्फे 5000/- रू. देणगी देण्यात आली तर यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात पुढे केला.

ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. या कुस्ती समिती मंडळ अध्यक्ष मारोती भीमराव पाटील, उपाध्यक्ष रामलु कोरटे व रफिक पटेल, सचिव दत्तात्रय कंदलवार, दिलीप गायकवाड, सहसचिव ज्ञानेश्वर म्याकलवार, नरसिंग करे, कोषाध्यक्ष नरेश कर्णे, संतोष नल्लामडगे, कार्याध्यक्ष सायलू सुरावार, नागनाथ कऱ्हाडे, कार्याध्यक्ष अंबादास कऱ्हाडे, विजय कंदलवार, राजू शंकरराव पाटील, माजी सरपंच यशवंत शंकरराव पाटील, व्यंकट शंकरराव पाटील, गोविंद शंकरराव पाटील, अशोकराव गोपछडे, अॅड रवींद्र पाटील, संतोष पाटील, कैलास हसनाळे, अंबादास पाटील, अॅड संजय देशमुख, देवेंद कऱ्हाडे, व्यंकटराव पाटील, बालाजी पाटील, प्रकाश कर्णे,आनंद कऱ्हाडे, खाजामिया शेख, राम सिद्धपा पाटील ,यादव कऱ्हाडे, यादव कांबळे, काशिनाथआप्पा स्वामी, मिलींद वनंजे, व्यंकटराव पाटील, माधव कर्णे, गंगाधर कुऱ्हाडे, राजू पाटील, जगदीश कऱ्हाडे, हुल्लाजी भालके, जगदीश कऱ्हाडे, राजू पाटील, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तर या स्पर्धेचे सुत्रसंचलन शाहिर माणिक कोकले आणि उत्तम वनंजे यांनी केले तर पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्रुदेव पवार, पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड, उपनिरीक्षक महाजन मैसनवाड, पोलीस जमादार मोहन कनकवले, पोलीस जमादार बालाजी पुरी, पोलीस हवालदार कृष्णा तलवारे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव वानरे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल अटकोरे, पोलीस कॉन्स्टेबल बळीराम घुळे आदींनी शांततेत पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.

Post Views: 46
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या मुलाखती

Next Post

अशोक चव्हाण ओबीसी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करतात गोविंद गोपनपल्ले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अशोक चव्हाण ओबीसी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करतात गोविंद गोपनपल्ले

ताज्या बातम्या

इतिहासाने नोंद घ्यावी असे कार्य करा – ॲड.गजानन भाकरे

February 22, 2026

पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या तब्बल 406 धावा; कर्णधार सचिन धस 199 धावावर नाबाद

February 22, 2026

शिवरत्न सेमी मध्ये स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू करणार – शितलदेवी मोहिते पाटील

February 22, 2026

माझी वसुंधरा ४.० मध्ये सोलापूरला मानाचा मुकुट

February 22, 2026

आयुक्तपदी एक वर्षपूर्ती निमित्त डॉ. सचिन ओम्बासे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार 

February 22, 2026

महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश चव्हाण

February 22, 2026

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ही वाव मिळावा – प्रा.प्रशांत धनवे

February 22, 2026

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी’ कायदा तात्काळ करण्याच्या मागणीला जोर धरला !

February 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0693899

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697