Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त यंदाचा ३१ ऑक्टोबर रोजीचा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ असेल विशेष

तरुण भारतbyतरुण भारत
October 26, 2025
in mumbai
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई  : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय एकता दिवस भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त यंदाचा राष्ट्रीय एकता दिवस हा विशेष सोहळा ठरेल. यंदाचा उत्सव अनेक प्रकारे आगळा ठरेल आणि तो कायम स्मरणात राहील.

राष्ट्रीय एकता दिनाचा वार्षिक उत्सव देशवासीयांना स्वतंत्र भारताच्या निर्मितीत आणि 562  संस्थानांना एकत्र आणून आधुनिक भारताचा पाया रचण्यामध्ये सरदार पटेल यांनी बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेची आठवण करून देतो. त्यांचे नेतृत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रति  असलेल्या अढळ वचनबद्धतेमुळे, सरदार पटेल यांना “राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार आणि भारताचे लोहपुरुष” म्हणून आदरणीय मानले जाते.

यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या अनोख्या सोहळ्यात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जाईल. संचलनादरम्यान, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि राज्य पोलिस दल त्यांचे कौशल्य, शिस्त आणि शौर्य प्रदर्शित करतील. या वर्षी राष्ट्रीय एकता दिनाच्या संचलनमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा दल (एसएसबी), तसेच आसाम, त्रिपुरा, ओदिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांचे पोलीस दल आणि राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी) यांच्या तुकड्यांचा समावेश असेल. या संचलनात घोडदळ आणि उंटांवर स्वार झालेल्या तुकड्या, तसेच देशी कुत्र्यांच्या प्रजाती आणि विविध मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कवायतींची प्रात्यक्षिके असतील.

या संचलनात महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभागही दिसून येईल. पंतप्रधानांना देण्यात येणाऱ्या गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्व एक महिला अधिकारी करणार आहे. सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या महिला कर्मचारी मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कवायतींचे प्रात्यक्षिक दाखवतील, यामधून भारताच्या कन्यांचे सामर्थ्य आणि धैर्य प्रदर्शित होईल.

या वर्षीच्या संचलनामध्ये बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलामधील भारतीय श्वान प्रजातीतील   कुत्र्यांचा समावेश असलेले ‘मार्चिंग’  पथक, गुजरात पोलिसांचे अश्‍वदल,  आसाम पोलिसांचा मोटारसायकल ‘डेअरडेव्हिल’ शो  आणि सीमा सुरक्षा दलाचे  उंट पथक  आणि उंटावर स्वार  बँड यांचा समावेश हे यंदाच्या कार्यक्रमाचे  प्रमुख आकर्षण असतील.

एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे  छात्र  आणि शालेय बँड त्यांच्या लक्षवेधी सादरीकरणाने समारंभाची शोभा वाढणार आहे. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण पथकाची नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिके संचलनाची  शान आणखी  वाढवणार आहेत.

विविधतेतील  एकतेचा संदेश देण्यासाठी, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे  चित्ररथ देखील संचलनाचा भाग असतील. यावर्षीच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या संचलनामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दल  (एनएसजी), एनडीआरएफ, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, अंदमान आणि निकोबार बेटे, मणिपूर, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड आणि पुडुचेरी यांचे 10 चित्ररथ असतील, त्यातून “विविधतेत एकता”  संकल्पना प्रतिबिंबीत होईल.

या वर्षीच्या संचलनाला अधिक भव्य बनवण्यासाठी, बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, दिल्ली पोलिस, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि जम्मू आणि काश्मीरचे ब्रास बँड देखील सहभागी होतील. या वर्षी संचलनामध्ये सीआरपीएफचे पाच शौर्य चक्र विजेते आणि बीएसएफचे 16 वीरता  पदक विजेते सहभागी होतील. झारखंडमधील नक्षलविरोधी कारवाया आणि जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये या शूर व्यक्तींनी असामान्य  धैर्य दाखवले. पश्चिम सीमेवर ऑपरेशन सिंदूर दरम्यान बीएसएफच्या जवानांनी त्यांचे अतुलनीय शौर्य आणि धाडस दाखवले.

या संचलनाबरोबरच  सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात, आपल्या संस्कृतीची समृद्ध विविधता आणि राष्ट्रीय एकतेला उजाळा देणारे  900 कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करतील.

राष्ट्रीय एकता दिवस उत्सवाचे उद्दिष्ट राष्ट्रीय एकता, सौहार्द आणि देशभक्तीची भावना जागृत  करणे, नागरिकांना या मूल्यांचा अंगीकार करण्यास प्रेरणा देणे   आहे. सर्व नागरिकांना या भव्य आणि महाउत्सवात सक्रिय सहभागी होण्यासाठी आणि भाग घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे.

1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत, एकता नगर येथे भारत पर्व आयोजित केले जाईल, ज्यामध्ये विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्य महोत्सवाचा समावेश असेल. 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करणाऱ्या विशेष कार्यक्रमांनी या महोत्सवाचा समारोप होईल. त्यामध्ये आपल्या आदिवासी समुदायांची  वैभवशाली संस्कृती आणि सळसळत्या चैतन्यावर  प्रकाश टाकण्यात येईल.

Post Views: 50
Previous Post

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक; सेरेना म्हसकरचे क्रीडा मंत्री यांनी केले अभिनंदन

Next Post

दक्षता जनजागृती सप्ताहादरम्यान भ्रष्टाचारविरोधी संदेश प्रसारित करण्याचे आवाहन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दक्षता जनजागृती सप्ताहादरम्यान भ्रष्टाचारविरोधी संदेश प्रसारित करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग:  रॉयल्स, गुलमोहर के.के. संघ उपांत्य फेरीत 

इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग:  रॉयल्स, गुलमोहर के.के. संघ उपांत्य फेरीत 

April 11, 2026
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापकपदी प्रवीण घन यांची नियुक्ती

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापकपदी प्रवीण घन यांची नियुक्ती

April 11, 2026
देवाच्या सोळावीने श्री अर्धनारी नटेश्वर यात्रेची उत्साहात सांगता !

देवाच्या सोळावीने श्री अर्धनारी नटेश्वर यात्रेची उत्साहात सांगता !

April 11, 2026
डिजिटल मीडियाच्या गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण

डिजिटल मीडियाच्या गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण

April 11, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी

उजनी धरणातून भीमा नदीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी

April 11, 2026
एस.टी. बस चालकाच्या मनमानीस कोण लगाम घालणार  

एस.टी. बस चालकाच्या मनमानीस कोण लगाम घालणार  

April 11, 2026
उपळे दुमाला येथे समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उपळे दुमाला येथे समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 11, 2026
महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त पिसेवडी रक्तदान शिबिर; ११० बॉटल रक्तसंकलन

महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त पिसेवडी रक्तदान शिबिर; ११० बॉटल रक्तसंकलन

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0801625

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697