पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीवच्या शहराध्यक्षा पुनम भैस यांच्या वतीने जागतिक महिला दिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महिलांना कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ करिष्मा वनवे, पिलीव पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ नम्रता पुकळे ,तांदुळवाडी पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ मनिषा पाटील यांच्या शुभहस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ करिष्मा वनवे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना स्वतःचे आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्य व शरीर सुदृढ ठेवण्याला प्राधान्य दिले पाहिजे त्याचप्रमाणे समाजामध्ये चालत आलेल्या रूढी परंपरा बदलून बालविवाह थांबवून बालविवाह टाळण्यासाठी,बालवयात केलेल्या विवाहामुळे महिलांचे अतोनात सर्व प्रकारे नुकसान होते, अल्प वयात विवाह केल्यामुळे लवकर आपत्य होतात व शारीरिक व्याधी आजार लागतात अल्प वयात जास्त वयाच्या पुरुषाबरोबर लग्न केल्यामुळे लवकरच वैधव्य प्राप्त होते त्यामुळे पुढील आयुष्य जगणे सर्व दृष्टीने कठीण व अडचणीचे होत राहते त्यामुळे मुलींनी व पालकांनी अल्पवयात विवाह करणे टाळावे त्याचप्रमाणे अल्प वयात लग्न करणे कायद्याने अन्यायकारक व हो चुकीचे आहे .
यावेळी त्यांनी अल्पवयामध्ये घडणाऱ्या गुन्ह्याविषयी व कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी ॲडव्होकेटआसावरी घाटे यांनी महिला विषयी समाजामध्ये असणारे स्थान व महिला विषयी असणाऱ्या कायद्याविषयी तरतुदीची उदाहरणे देऊन माहिती दिली. यावेळी शहराध्यक्ष पूनम भैस आपले पती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मित अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून राज्याचा कारभार व पक्षाची सूत्रे स्वीकारण्याचा निर्धार करून दुःख विसरून सर्वसामान्यांसाठी काम करताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळीअंगणवाडी पर्यवेक्षिका राऊत मॅडम, डॉक्टर शेवाळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन करडे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शहराध्यक्ष सौ पुनम भैस यांनी व्यक्त केले सूत्रसंचालन करडे मॅडम यांनी केले
यावेळी निर्भया पथकाच्या सपोनी सौ.
करिष्मा वनवे प्रशासक एम व्ही मिसाळ ग्रामपंचायत अधिकारी सदाशिव भंडलकर ,दामोदर लोखंडे पिलीव पिलीव पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ.नम्रता पुकळे, तांदळवाडी गणाच्या सौ मनिषा पाटील ॲड आसावरी घाटे, सौ स्नेहल पाटील, समाधान देशमुख, सौ पद्मजा पिसे ,अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सेविका उपस्थित होत्या
यावेळी उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला .
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करताना निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. करिष्मा वनवे ॲड आसावरी घाटे ,सौ नम्रता पुकळे,सौ मनिषा पाटील , पुनम भैस सौ .स्नेहल पाटील ,श्रीमती राऊत मॅडम ,करडे मॅडम ,शेवाळे मॅडम प्रशासक मिसाळ ,सदाशिव भंडलकर, दामोदर लोखंडे आदी मान्यवर.
























