वेळापूर – येथील ग्रामदैवत श्री अर्धनारी नटेश्वर यात्रेची सांगता देवाच्या सोळावी निमित्त आयोजित जागरण-गोंधळ व सत्यनारायण महापूजा कार्यक्रमाने अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली.
शुक्रवारी सकाळी पुजेचे मानकरी गंगाधर होडगे व लता होडगे यांच्या हस्ते सकाळी ११.०० वाजता सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. या वेळी श्री अर्धनारी नटेश्वरास मानाचा पोशाख अर्पण करण्यात आला. या पूजेचे पौरोहित्य महेश स्वामी, मन्मथ स्वामी, विवेक जोशी यांनी केले.
या प्रसंगी जीवन जानकर, वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगूसकर, तसेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष काशिनाथ आडत, उपाध्यक्ष अॅड. विठ्ठल मंडले, उपाध्यक्ष रणजीत साठे, कार्याध्यक्ष अमोल मंडलिक, खजिनदार दादा तुपे, सरचिटणीस विनायक भगत, सचिव अभिजीत साठे, सेक्रेटरी विजय पवार, सदस्य मनोहर माने, शैलेश होडगे, धनंजय माने देशमुख, जवान माने देशमुख, संजय मंडले, दीपकआबा राऊत, अमृतराव माने देशमुख, रविराज गायकवाड, सौ. सीमा खाडे, प्रियंका आडत, माजी उपसरपंच जावेद मुलाणी, महादेव म्हेत्रे, शिवाजी सावंत, युवराज मंडले, शिवाजी मंडले, शंकर आडत, डॉ. धनंजय मेहञे, राहुल सराटे, धनंजय शिवपुजे, रायचंद खाडे, पुजारी गौरीहर गुरव, सतिश गुरव, रविराज गुरव यांच्यासह अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी सोळावी निमित्त देवाला पारंपरिक जागरण गोंधळ घालण्यात आला. यावेळी ग्रामस्थ व नागरिकांकडून भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सोळावीच्या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली होती.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांमुळे श्री अर्धनारी नटेश्वर यात्रेची सांगता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
ग्रामदैवत अर्धनारी नटेश्वराचा संपूर्ण यात्रा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आमदार उत्तमराव जानकर, पं. स. सदस्या सौ. विमलताई जानकर, जि. प. सदस्या मीनाक्षीताई मिलिंद सरतापे, वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर, ग्राम विकास अधिकारी कैलास सुरवसे, यात्रा कमिटी अध्यक्ष काशिनाथबापू आडत व त्यांचे सर्व सहकारी, वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी आशिष कांबळे, तरुण भाविक, तसेच ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
—————————————























