अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मयुर बोर्डे यांची प्रकृती खालावली
जाफ्राबाद प्रतिनिधी
जानेफळ पंडीत येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस तरीही बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच.शेतकऱ्यांचा रिलायन्स इन्शुरन्स, एच डी एफ सी, युनिव्हर्सल या तीनही पिक विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे बाकी आहेत ते तात्काळ द्यावे व फसवणुक करणाऱ्या या तीनही कंपन्यांवर गुन्हा दाखल करावा तसेच दुष्काळाचे अनुदान तात्काळ द्यावे या मागणीवर मयुर बोर्डे ठाम आहेत.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वाघमारे यांनी त्यांची तब्येत खालावली त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात यावे असे पत्र पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना व तालुका प्रशासनाला दिले,
परतू मयुर बोर्डे यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने पोलिसांची व प्रशासनाची धांदल उडाली.या आंदोलन स्थळी तहसिल कार्यालयाचे अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी पवार,तालुका कृषी अधिकारी शिंदे यांनी विनवणी करून देखिल मयुर बोर्डे अटीवर ठाम आहेत.