मंगळवेढा – विधानसभेत चार तहसिलदार,चार मंडलाधिकारी दोन ग्राम महसूल अधिकारी यांना निलंबीत केल्याने त्यांचे निलंबन रद्द करावे या मागणीसाठी मंगळवेढा महसूल विभागातील कर्मचारी दि.16 पासून सामुहिक रजेवर गेल्याने कामानिमित्त येणार्या नागरिकांची मोठी हेळसांड झाल्याचे चित्र होते.
नागपूर हिवाळी अधिवेशनात दि.12 रोजी लक्षवेधी प्रश्नाव्दारे गौण खनिज प्रकरणामधील कामकाजाकडे दुर्लक्ष केल्याने चार तहसिलदार, चार मंडलाधिकारी,दोन ग्राम महसूल अधिकारी यांना अन्यायकारक पध्दतीने विधानसभेत निलंबीत केल्याचा दावा महसूल कर्मचार्यांनी करुन सामुहिक रजा टाकून आंदोलन छेडले आहे.
मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिक कामानिमित्त तहसिल कार्यालयात आल्यानंतर सर्व कामकाज ठप्प असल्याचे दिसल्याने त्यांनी नाराजी व्यक्ती करत आल्या पावलाने परत जाणे पसंद केले. सामुहिक रजेचे निवेदन कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षामार्फत जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. या निवेदनावर महसूल सहाय्यक एस.आर.कोळी, सहाय्यक म.अधिकारी,पी.आर.निराळी, ए.पी.वानोळे,संगीता ताड,व्ही.आर.उगले, आर.ए.जुंदळे, ए.एल.गायकवाड,एम.एस.शिंदे, यु.आर. बनसोडे आदी कर्मचार्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत. मंगळवारी तहसिल कार्यालयात केवळ निवासी नायब तहसिलदार या उपस्थित होत्या.
फोटो ओळी
मंगळवेढा तहसिल कार्यालयातील सामुहिक रजेबाबत निवेदन तहसिलदार मदन जाधव यांना देताना कर्मचारी छायाचित्रात दिसत आहेत.
























