बार्शी – बार्शी तालुक्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. महायुती सरकारच्या वतीने तर शेतकऱ्यांना शासनस्तरावर मदत होत आहे. परंतु शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिल्लक ठेवीपैकी रुपये १,००,००,००० (एक कोटी) चा धनादेश सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिला.
बार्शीतील अनेक समाजसेवी संस्था, डॉक्टर, उद्योजक, व्यापारी, विविध संघटना यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केलेली आहे. बार्शी तालुक्याच्या वतीने विविध माध्यमांतून आत्तापर्यंत रुपये १,२९,०३,२११ रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून देण्यात आली आहे .