सोलापूर : बाथरूमला गेलेल्या एकाचा अचानक चक्कर येऊल पडल्याने मृत्यू झाला. हा प्रकार उत्तर सोलापूर तालुकयातील बीबी दारफळ या गावात शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास घडला.
वामन मच्छिद्र कांबळे (वय 65 , रा. बीबी दारफळ ता उ सोलापूर) असे मृत पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. वामन हे शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास राहत्या घरात बाथरूमला गेले होते. बाथरूममध्ये अचानक पाय घसरून ते पडले. त्यातच ते बेशुध्द पडल्याने त्यांना सायंकाळी पाच वाजता किरण कांबळे याने उपचारास दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच ते मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.