वैराग – शहराच्या लगत असलेल्या पेशवेकालीन गाव तलावात पडून विजय श्रीरंग लोहार यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि .२९ रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत माहिती अशी की वैराग हिंगणी रोड वर असलेल्या पेशवेकालीन तलावात एक पुरुष जातीचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याची माहिती वैराग पोलिसांना बुधवारी सकाळी समजली .वैराग पोलिसांनी घटनास्थळी पीएसआय प्रतापसिंह जाधव ,पोकॉ शिवलिंग कांबळे ,आकाश पवार ,राहूल पाटील यांच्या पथकाने भेट देवून पाहणी केली . त्यानंतर पोलिसांनी समाधान ढेकळे ,वैराग नगरपंचायतचे आरोग्य समितीचे सभापती नागनाथ वाघ ,नगरपंचयातचे कर्मच्यारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मदतीने पाण्यावर तरंगणारे प्रेत बाहेर काढले .
पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्ती हा विजय श्रीरंग लोहार रा .वैराग याचे असल्याची खात्री झाली असून प्रेतचे शवविच्छेदन जागेवरच करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत


















