वैराग – शेतातून गावाकडे सायंकाळी येत असताना ट्रॅक्टरने पाठीमागून धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाला आहे . सदरची घटना वैराग -धामणगाव रोडवर शनिवारी 13 डिसेंबर रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे .वैराग पोलिसात मयताचा चुलत भाऊ विलास शिवाजी गायकवाड यांनी फिर्याद दिल्याने रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला .
सर्जापूर येथील नितीन भिमराव गायकवाड ( वय ४५ वर्ष) हे आपल्या शेतातून सर्जापूर गावाकडे वैराग – धामणगाव रोडने चालत येत होते .दरम्यान या रस्त्यावरील सर्जापूर हद्दीतील ओढयावर ट्रॅक्टर ( एम एच २३ बी एन २७७३ )चालक नवनाथ तुकाराम डोंगरे रा . कासारी जिल्हा बीड याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरने नितीन गायकवाड याला पाठीमागून जोराची धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे .
याबाबत ट्रॅक्टर चालका विरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे . पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन मुंडे हे करीत आहेत .


























