सोलापूर, 26 जुलै (हिं.स.)।
बेकायदा वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांना पाहताच चालकाने वेगाने पळविल्याने टेम्पो पलटी होवून अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. देवल उगाडे असे अपघातातील मृत तरूणाचे नाव आहे.
या प्रकरणी वाहन चालक सुरज शहाजी चव्हाण (रा.सांगोला), गणेश दत्तत्राय मस्के, गणेश भाऊसाहेब मस्के, देवल शक्तीमान उगाडे (रा.शिरगाव ता.पंढरपूर), वाहन मालक चैतन्य सुभाष गायकवाड (रा.ओझेवाडी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलीस नाईक, ईश्वर दुधाळ व पोलीस हवालदार श्रीमंत पवार, पोलीस अंमलदार कदम हे उचेठाण परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यादरम्यान चारचाकी एन्ट्रा टेम्पो येताना पोलिसांच्या नजरेस पडला. वाळू वाहतूकीचा संशय आल्याने पोलिसांनी टेम्पो थांबविण्याचा इशारा केला, मात्र टेम्पो चालकाने पोलिसांना पाहून टेम्पो भरधाव वेगाने पळविला. उचेठाण गावच्या दिशेने जात असताना गडदे वस्ती येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अन्य एकजण जखमी आहे. याप्रकरणी या प्रकरणी वाहन चालक सुरज शहाजी चव्हाण, गणेश दत्तत्राय मस्के, गणेश भाऊसाहेब मस्के, देवल शक्तीमान उघडे (रा.शिरगाव ता.पंढरपूर), वाहन मालक चैतन्य सुभाष गायकवाड (रा.ओझेवाडी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.