भोकरदन : तालुक्यातील वालसावंगी येथे मा श्री राजाभाऊ देशमुख मिञमंडळ भोकरदन- जाफ्राबाद द्वारे आयोजित काँगेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हभप शिवलिलाताई पाटील यांनी कीर्तनासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा अभंग ” आपुलिया हिता जो असे जागता ! धन्य माता पिता तया चिया ! कुळी कन्या पुञ होती ती सात्विक! तयाचा हरिख वाटे देवा ! गीता भागवत करिती श्रवण! अखंड चिंतन विठोबाचे! तुका म्हणे मज घडो त्याची सेवा! तरी माझ्या दैवा पार नाही!! या अभंगाच्या निरुपम प्रसंगी शिवलिलाताई महाराज म्हणाल्या की तुम्ही फक्त एकच काम करा आपल्या वयोवृद्ध आई वडिलांची सेवा करा त्यांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा आहे, आजकालच्या मुली बाबत त्या म्हणाल्या की तुम्ही काही चांगल काम नाही तरी चालेल परंतु आपल्या आईवडिलांची मान शरमेने कधीच खाली होईल असे वागु नका असे त्या आपल्या कीर्तनात म्हणाल्या.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मा नगराध्यक्षा मंजुषाताई देशमुख, प्रियाताई देशमुख,संगीता फुसे,प्रतीक देशमुख, इंद्रजीत देशमुख हभप विष्णु महाराज सास्ते,मा जि प सदस्य शंकर भुते, शिवसेनेचे सुभाष राऊत, संदिप लोखंडे,तुकाराम फुसे,नारायण हिवाळे,सचिन जाधव,संतोष माळोदे,राहुल कोळेकर,कपिल भुते,दिपक भुते, पञकार विशाल अस्वार,हरिदास गवळी,मनीष अस्वार,मिलींद साळवे,नारायण हिवाळे,कौतिक हिवाळे,अमोल फुसे,प्रभाकर तळेकर, राम देशमुख, दादाराव देशमुख,राहुल देशमुख, रमेश जाधव, सोपान सपकाळ, रामचंद्र गायके,रोषण देशमुख यांच्यासह टाळकरी,भजनी मंडळ व भाविक भक्त व गावकरी यांची उपस्थिती होती.