Sunday, March 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गल्लीतल्या मुलीला दिल्लीपर्यंत नेण्याचं धाडस फक्त एकनाथ शिंदेंच करू शकतात

तरुण भारतbyतरुण भारत
March 8, 2026
in editor
0
गल्लीतल्या मुलीला दिल्लीपर्यंत नेण्याचं धाडस फक्त एकनाथ शिंदेंच करू शकतात
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शिवसेनेकडून प्रा. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. राज्यसभा खासदार झाल्यानंतर प्रथमच सोलापुरात आलेल्या वाघमारे यांचे बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे हे महिला आघाडीला रणरागिणी म्हणायचे. शिवसैनिक हाच आमचा धर्म, हाच वारसा एकनाथ शिंदेंनी पुढे नेला आहे. गरीब मागासवर्गीय वस्तीत राहणाऱ्या मुलीला, गल्लीतल्या मुलीला दिल्लीपर्यंत नेण्याचं धाडस फक्त एकनाथ शिंदेंच करू शकतात. काही नेते आपल्या कुटुंबाला आपला पक्ष असतात, तर काही नेते आपल्या पक्षाला कुटुंब समजतात, असे खासदार ज्योती वाघमारे यांनी सांगितले.

आजोबांनी रस्त्यावर बसून चपला शिवल्या… वडिलांनी वेटर म्हणून काम केलं आणि आई गिरणी कामगार म्हणून परिस्थितीशी झगडत राहिली. मातीत मळलेल्या लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मला राज्यसभेची उमेदवारी दिली. माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला उमेदवारी देऊन शिवसेनेत जातीपतीला थारा नाही, हे शिंदे यांनी दाखवून दिले आहे, अशी भावना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, आयुष्यातील 30-35 वर्षे या झोपडपट्टीत गेली, याच झाडाखाली बसून 10 वी ते पीएच.डी.चा अभ्यास केला. वडील नगरसेवक झाले तरी घरं मातीचं होतं. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एका झोपडपट्टीतील मुलीला राज्यसभेत काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.

वाघमारे म्हणाल्या, सोलापूर ही माझी मायभूमी आहे, त्यामुळे माझ्या मायभूमीला नतमस्तक होण्यासाठी मी आलेय. सोलापूरकरांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, प्रत्येक भूमिकेत त्यांनी मला स्वीकारलेलं आहे. दिल्लीत गेल्यावरही मी सोलापूरला कधी विसरणार नाही, सोलापूरचा स्वाभिमान मी दिल्लीत मिरवेन.

मी राजकन्या नाही, संघर्षकन्या आहे. गरिब आई-बापाची पोरगी आहे. माझा बाप मोठा नाही, मी बंगल्यात राहणारी नाही, माझं घरं फाटकं आहे. वस्तीतला लोकांच्या कष्टाची जाणीव मला आहे, प्रत्येक कष्टकऱ्याच्या प्रश्नाला मी दिल्ली दरबारी आवाज उठवेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post Views: 10
Previous Post

स्वामी विवेकानंदांनी जगाला भारतीय संस्कृतीची आणि तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली

Next Post

मालगोंडा हॉस्पिटलमध्ये पोटाच्या कॅन्सरवर यशस्वी उपचार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मालगोंडा हॉस्पिटलमध्ये पोटाच्या कॅन्सरवर यशस्वी उपचार

मालगोंडा हॉस्पिटलमध्ये पोटाच्या कॅन्सरवर यशस्वी उपचार

ताज्या बातम्या

तीन लाखांच्या नकली नोटा थेट व्यवहारात …. #public #maharashtranews #viral #solapurnews

March 8, 2026

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सन्मान. #public #solapurnews #viral

March 8, 2026
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान 

March 8, 2026
संकष्ट चतुर्थी निमित्त स्वामीनाथ बाबर व संकेत पवार यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा

संकष्ट चतुर्थी निमित्त स्वामीनाथ बाबर व संकेत पवार यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा

March 8, 2026
डॉ.सुनयना माळी बेस्ट रिव्हिव्हर म्हणून सन्मानित

डॉ.सुनयना माळी बेस्ट रिव्हिव्हर म्हणून सन्मानित

March 8, 2026
समाजाच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे – सी. ई.ओ.कुलदीप जंगम

समाजाच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे – सी. ई.ओ.कुलदीप जंगम

March 8, 2026
श्री सिद्धेश्वर तलावाच्या शुद्धीकरणासाठी ‘बायोकल्चर’ प्रकल्पाचे यशस्वी प्रात्यक्षिक

श्री सिद्धेश्वर तलावाच्या शुद्धीकरणासाठी ‘बायोकल्चर’ प्रकल्पाचे यशस्वी प्रात्यक्षिक

March 8, 2026
नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास तीव्र विरोध

नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास तीव्र विरोध

March 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0719555

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697