Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वामी विवेकानंदांनी जगाला भारतीय संस्कृतीची आणि तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली

तरुण भारतbyतरुण भारत
March 8, 2026
in education
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – ‘१८९३ साली स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय धर्मपरिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणामुळे संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भारत हा ज्ञानाचे भांडार असलेला आणि वैभवसंपन्न देश आहे, याची जाणीव जगाला झाली. याच घटनेतून भारताच्या पुनरुत्थानाची मुहूर्तमेढ रोवली गेली,’ असे मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले. 

एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठांमध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सह-अध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड-चाटे, विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी, कुलसचिव प्राणेश मुरनाळ,  उषा विश्वनाथ कराड, संचालक स्ट्रॅटजी अँड ऑपरेशन्स राघवेंद्र एम. चाटे, सिद्धेश्वर देवस्थानच पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, चार्टर्ड अकाऊंटंट राज मिणियार, सोलापूर आर्किटेक्चर असोसिएशनचे असिम सिंदकी, कायझन होंडाचे संचालक सुरेन्द्र शिरकोळे आणि सोलापुरातील मान्यवर उपस्थित होते

पुढे बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, “देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पुढील दहा वर्षात आपण आपल्या देशाच्या गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचा संकल्प करण्याचे आहावन केले. परंतु स्वातंत्र्यानंतर तसे कार्य करण्याची प्रेरणा कोणी दिली असेल तर ती स्वामी विवेकानंदांनी दिली आणि त्या गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचे काम ज्या प्रकारे एमआयटीमध्ये प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्याकडून होत आहे ते पाहून स्तिमित व्हायला होत.

——-

सत्ता, संपत्ती आणि कीर्ती पंचवण्यासाठी अध्यात्माचे बळ

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, “सत्ता, संपत्ती आणि कीर्ती पंचवण्यासाठी अध्यात्माचे बळ लागते आणि ते प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या वारकरी तत्वज्ञानाचा अंगीकार करत मूल्य शिक्षणाचा वारसा उभा केला.” 

——–

जगाला संताच्या विश्वात्मके देवाच्या प्रार्थनेची गरज

अध्यक्षीय भाषणात एमआयटी समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले की, “ग्रामदैवत सिध्दरामेश्वराच्या भूमीत स्वामी विवेकानंद यांचा पुतळा उभारणी हा एक योग अभुतपूर्व आहे. सध्याच्या परिस्थितीत जगाला संताच्या विश्वात्मके देवाच्या प्रार्थनेची गरज आहे. युनेस्कोमध्ये संत ज्ञानेश्वरांची विश्वकल्याणाचे पसायदान प्रार्थना पोहोचवता आल्याचे समाधान आहे. 

———

 प्रास्ताविकात  एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे यांनी  “वर्गामध्ये विषयाचे ज्ञान घेणे जसे आवश्यक आहे तसेच वर्गाच्या बाहेरही विद्यार्थ्यांना देशात होऊन गेलेल्या थोर महापुरुषांची महती समजावी आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडावे हे या संस्थेचे नेहमीच ध्येय राहिले आहे. विद्यापीठामध्ये उभारण्यात आलेला हा स्वामी विवेकानंदांचा पुतळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरेल.” असे मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित भिमण्णा जाधव यांचे सुंद्री वादन झाले. एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. गोपाळकृष्ण जोशी यांनी प्रास्ताविक केले तर कुलसचिव प्राणेश मुरनाळ यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, विद्यापीठाचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 44
Previous Post

धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवले; संपूर्ण परिसर झाला ‘भोंगेमुक्त’

Next Post

गल्लीतल्या मुलीला दिल्लीपर्यंत नेण्याचं धाडस फक्त एकनाथ शिंदेंच करू शकतात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
गल्लीतल्या मुलीला दिल्लीपर्यंत नेण्याचं धाडस फक्त एकनाथ शिंदेंच करू शकतात

गल्लीतल्या मुलीला दिल्लीपर्यंत नेण्याचं धाडस फक्त एकनाथ शिंदेंच करू शकतात

ताज्या बातम्या

बदलापुरात नगरसेवकावरच हल्ला #viral #news

September 5, 2026

जिल्हाधिकाऱ्यांनी काढला थेट या गोष्टीचा आदेश #solapurnews #viral

September 5, 2026

अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी पार्क चौकातील अतिक्रमण करणाऱ्या गाड्यांना इशारा #viral #solapurnews

September 5, 2026

आमदार पडळकर आणि मराठा आंदोलक आमने सामने #viral #marathinews

September 5, 2026

बापूजी नगरातील वादग्रस्त समाजमंदिर महापालिकेने घेतले ताब्यात

September 5, 2026

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी केली मार्गांची पाहणी #solapurnews #news

September 5, 2026

श्रावण शुक्रवार निमित्त विठ्ठल रुक्मिणीस सुवर्ण अलंकारांनी नटविले #viral #marathinews #news

September 5, 2026

वालचंद कॉलेज समोरचे अतिक्रमण हटवले

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1165438

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!